विहिरीत अडकलेल्या महाकाय अजगरांच्या रेस्क्यूचा थरार; शेपटीला पकडून ओढणार इतक्यात घडले असे काही की…; धडकी भरवणारा VIDEO

Pythons Shocking Video

 

 

Pythons Shocking Video : अजगर हा जगातील सर्वात धोकादायक प्राणी मानला जातो .त्याचे शरीर पाहूनचं भल्याभल्यांना घाम

फुटतो. अजगरच्या जाळ्यात एखादा प्राणी किंवा माणूस जरी आला तर तो त्याला जिवंत गिळतो. घनदाट जंगलात आढळणारा हा

प्राणी कधीकधी भक्ष्याच्या शोधात मानवी वस्ती असलेल्या भागात देखील प्रवेश करतो. पण कधी भक्षाची शिकार करताना हा प्राणी

स्वत:च अडचणीत येतो. अशाच प्रकारे दोन महाकाय अजगर भक्ष्याच्या शोधात असताना विहीरीत जाऊन पडले आणि तिथेच

अडकले, हे अजगर इतके मोठे होते की, त्यांना बाहेर काढण्यासाठी ५ ते ६ लोकांचे बळ देखील कमी पडत होते. याच अजगरांच्या

थरार रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्याही काळजात धडकी

भरल्याशिवाय राहणार नाही.

प्रत्यक्षात हे महाकाय अजगर पाण्याने भरलेल्या एका विहिरीत पडल्याचे दिसत आहेत. ज्यांची बाहेर येण्यासाठी खूप धडपड सुरु होती. पण काही केल्या त्यांना विहीर बाहेर पडता येत नव्हते. अखेर सर्पमित्रांनी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करुन दोन्ही अजगरांची सुटका केली, या थरार रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ( Python rescued Terrifying Video)व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन महाकाय अजगर पाण्याने भरलेल्या विहीरीत अडकून पडले आहेत.

 

यावेळी काही सर्पप्रेमी अजगरांना विहिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हिडिओमध्ये पुढे दिसतेय की, एका व्यक्तीने विहिरीत उडी मारुन एका मोठ्या अजगराला हाताने पकडून त्याची शेपटी विहिरीबाहेर उभ्या असलेल्या लोकांकडे दिली. यावेळी बाहेर उभ्या असलेल्या लोकांनी अजगराची शेपटी घट्ट पकडून त्याला लगेच बाहेर काढण्यास सुरुवात केली. पण त्याचे वजनच इतके होते की, त्यांना बाहेर नीट खेचताही येत नव्हते, त्यामुळे त्यांनी अजगराला पुन्हा विहीरीत सोडले. यानंतर पुन्हा विहीरीत असलेल्या व्यक्तीने त्या अजगराची शेपटी त्यांच्याकडे दिली आणि अखेर त्यांनी जोर लावत खेचून अजगराला बाहेर काढले. यानंतर विहीरीत पाईपांमध्ये अडकलेल्या दुसऱ्या अजगराला बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले, हे अजगर इतके मोठे आहेत की, ते कोणालाही सहज गिळून खाऊ शकत होते. पण तरीही धाडस दाखवत या तरुणांनी दोन्ही अजगरांची सुखरुप सुटका केली.

 

अजगरांना जीवनदान देणाऱ्या तरुणांच्या धाडसाला सलाम
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अजगरांच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ पाहून अनेकांना धडकीच भरली. तर अनेकांनी ह्यांना इतकं धाडस येत कुठून असा सवाल केला. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक अजगरांना वाचवणाऱ्या तरुणांच्या धाडसाला सलाम करत आहेत.

Leave a Comment